NEWS - Devbhoomi Krushi Paryatan Khanu Ratnagiri

Go to content
कला शारदा ड्रॉइंग - स्कूल ट्युशन ट्रिप..2022...!!

धमाल.. मस्ती आणि मस्तीच बरोबर live sketching चे workshop.

काल दि. 20 11.22 रोजी मी आणि अश्विनी ने मिळून आमच्या क्लास च्या मुलांना घेउन देवभूमी अग्रो टुरिझम ला भेट दिली.

आमचे ठरले होते की 14 नोव्हेंबर ला घेउन जायचे बालदिना निमीत्ताने. पण काही कारणामुळे नाही जमले त्यावेळी. पण 20 तारीख जमली आणि आम्ही जाऊन आलो.

लहानपण देगा देवा... ह्याचा प्रत्यय आम्हाला काल आला. लहानपणीच्या सर्व आठ्वणी ह्या मुलांमुळे परत ताज्या झाल्या आणि त्यांच्यतलेच एक लहान मुल होउन आम्ही त्या मस्त एन्जॉय करु शकलो.

लहान असून देखील त्यांच्यात असलेला समंजसपणा, एकमेकाना सांभाळुन घेण्याचे कौशल्य कौतुकास्पद होते.

गेम्स खेळताना असो वा live sketching... जे करायचे ते अगदी मन लावून आणि 100% द्यायचे. हे ही बघायला मिळाले. खो खो, कबड्डी, सोनसाखळी, संगीत खुर्ची, क्रिकेट, सर्व खेळ अगदी मस्त एन्जॉय करत खेळत होते.

कोरोना काळात मुले मैदानी खेळ विसरली होती आणि मोबाइल मध्ये गुंतली होती. पण ह्या ट्रिप मुळे त्याना परत ते मैदानी खेळ खेळताना बघून आम्हाला खुप आनंद झाला.

Swimming pool होता पण पाणी बर्फासारखे गार असल्यामूळे आम्ही त्याना पोहायला परवानगी नाही दिली..कारण त्यांच्या activities सोबत त्यांच्या तब्येतीची ही काळजी आम्हाला घ्यायची होती. पण कोणत्याही मुलाने हट्ट केला नाही.

पण नेक्स्ट टाईम आम्हाला water park घेउन जायचे हे आम्हाला ठणकावून (आपलेपणाने) सांगितले.

निघताना सर्वांचे आवडते खाद्य "भेळ" खाऊन आम्ही 5.30 ला  परतीच्या प्रवासाला निघालो. तेव्हा सगळे म्हणाले एवढ्या लवकर नको जाऊया. एवढी रमली होती...!!

श्री. व सौ. कुलकर्णी यांचे आदरातिथ्य पण  उत्तम. त्यानी मुले येणार म्हटल्यावर नाश्ता, जेवण अगदी मुलाना त्रास होणार नाही याची काळजी घेत बनवले. त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद.

अश्या अजून भरपूर ट्रिपला आपण जायचय ह्या एका वाक्यावर त्यानी समाधान मानुन परत घरी जायला गाडीकडे पावले वळवली...!!!

All are waiting for next trippppppp......
Back to content